हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Samruddhi Mahamarg। मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उदघाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नई अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. इगतपुरी तेआमणे (Igatpuri to Amane) असा 76 किलोमीटर लांबीचा असा हा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आहे. या महामार्गामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर अवघ्या 8 मिनिटात गाठता येणार आहे. 76 किलोमीटरच्या या टप्प्यात एकूण 5 बोगदे आहेत. मात्र यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा इगतपुरीपासून सुरू होतो. तब्बल 8 किलोमीटर अंतराचा हा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगदा म्हणून ओळखला जाईल. आज आपण या बोगद्याचे खास वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.
कसा आहे बोगदा? Samruddhi Mahamarg
महाराष्ट्रातील या सर्वात मोठ्या बोगद्याला ३ लेन आहेत.
बोगद्याची लांबी 8 किलोमीटर आहे. उंची 9 मीटर आणि रुंदी 17.5 मीटर आहे.
बोगद्यातील भिंतींना फायर प्रोटेक्शन आणि लाईट रिफ्लेकटींग लावण्यात आले आहे, ज्यामुळे रस्त्यावर दिव्यांचा लखलखाट दिसतोय.
प्रत्येक 300 मीटर अंतरावर एक असे एकूण 26 क्रॉस पॅसेज देण्यात आले आहे.
एखादा अपघात घडला तर जवळच्या क्रॉस पॅसेजमधून बाहेर पडता येईल.
या बोगद्यात 100 डबल एक्सल रिव्हसेबल व्हेंटिलेशन फॅन बसविण्यात आले आहेत. हवा खेळती राहण्यास आणि गाड्यांचा धूर बाहेर निघण्यास यामुळे मदत होणार आहे.
प्रत्येक 90 मीटरच्या अंतरावर अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आली आहे, एखाद्या वाहनाला आग लागली आणि बोगद्यातील तापमान 60 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाली तर अटोमॅटिक स्प्रिंकल सुरू होतात
या बोगद्यातून ताशी १०० किलोमीटर वेगाने प्रवास करू शकता.
दरम्यान, आजच्या या शेवटच्या टप्प्याच्या उदघाटनानंतर समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) संपूर्णपणे प्रवाशांच्या सेवेत आला आहे. मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या या महामार्गामुळे कनेक्टिव्हिटी चांगलीच वाढली आहे. हा महामार्ग 10 जिल्ह्यांतून (नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे) आणि 390 गावांतून जातो. तसेच तो 24 जिल्ह्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जोडतो, विशेषत: विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने हा महामार्ग महत्वाचा ठरला आहे. 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास आता ८ तासात पुर्ण होईल. समृद्धी महामार्गावर 50 पेक्षा जास्त उड्डाणपूल, 24+ इंटरचेंज, 30 भुयारी मार्ग, 56 टोल बूथ बसवण्यात आले आहेत.