हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Samruddhi Mahamarg। मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उदघाटन येत्या ५ जूनला होणार आहे. खरं तर 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचा जवळपास 625 किलोमीटर पर्यंतचा टप्पा यापूर्वीच सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलं आहे, त्याठिकाणी प्रवासही होत आहे. आता शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटरचे लोकार्पण येत्या ५ जूनला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा उदघाटन सोहळा पार पडणार आहे. एकदा का हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत आला कि मग मुंबई ते नाशिक प्रवास अवघ्या २ तासांवर येणार आहे.
मुंबई ते नागपूर जलद प्रवासासाठी ‘एमएसआरडीसी’ने 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग उभारला. आत्तापर्यन्त यातील 625 किलोमीटर पर्यंतचा रस्ता आधीच लोकांच्या सेवेत आलाय. मात्र इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटरचे लोकार्पण कधी होणार? यावर अनेक दिवसापासून चर्चा सुरु आहे. यापूर्वी या टप्प्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी होईल असेही बोललं गेलं होते, मात्र त्यावेळी पंतप्रधान मोदी यांची वेळ न मिळाल्याने लोकार्पणाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५ जूनला इगतपुरी ते आमने समुद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) लोकार्पण होईल असं म्हंटल जातंय. यामुळे मुंबई ते नाशिक आणि मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान होईल.
मार्ग डोंगराळ असल्याने याठिकाणी 5 बोगदे- Samruddhi Mahamarg
इगतपुरी ते आमणे हा 76 किमीचा समृद्धी महामार्ग 35 मीटर रूंद आहे. हा मार्ग डोंगराळ असल्याने याठिकाणी पाच बोगदे उभारण्यात आले आहेत. त्यात इगतपुरी येथे 7.78 किमीचा राज्यातील सर्वाधित लांबीचा बोगदा असून यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर अवघ्या आठ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. मुंबई ते नाशिक प्रवासासाठी यापूर्वी 3 तास 45 मिनिटांहून अधिक वेळ लागायचा , मात्र आता समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Mahamarg) हा प्रवास 2 तास 30 मिनिटांवर आला आहे. म्हणजेच प्रवाशांचा 1 तास 20 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.




