Samruddhi Mahamarg : मुंबई – नागपूर सुसाsssट ! येत्या ऑगस्ट पर्यंत खुला होणार समृद्धीचा शेवटचा टप्पा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Samruddhi Mahamarg : राज्य सरकारने काही महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेतले आहेत, त्यापैकीच एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग… 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे काम आता पूर्ण होण्यासाठी केवळ शेवटचा टप्पा बाकी आहे, त्यापूर्वी वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या मार्गाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

समृद्धी महामार्गातील (Samruddhi Mahamarg) शेवटचा टप्पा असणाऱ्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा आहे त्या ऑगस्ट महिन्यात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांना नियोजन केलं असून एका पुलाची उर्वरित काम पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

समृद्धी महामार्गाच्या शेवटचा टप्प्याचे काम तसे पाहायला गेले तर किचकट पूल आणि बोगद्यांचा समावेश असलेलं आहे. सद्यस्थितीचा विचार करता यामधील बोगदे आणि रस्त्यांची काम पूर्ण करण्यात आली आहेत मात्र ठाण्यातील खर्डी इथं जवळपास 1.5 किलोमीटर लांबीच्या पुलाचं काम अजून बाकी आहे. खर्डी येथील पुलाचे काम हे प्रमुख आव्हान आहे याशिवाय आठ किलोमीटर (Samruddhi Mahamarg) लांबीच्या बोगद्याचे काम पूर्णत्वास आलेले आहे.

खरंतर 701 किलोमीटरचा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा सहा पदरी मार्ग आहे. मात्र खर्डी पुलावर हा मार्ग केवळ चार पदरी राहणार असून थोडासा अरुंद होणार असल्याची माहिती देखील या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे काम अवघड असल्यामुळे पुलाच्या उभारण्यासाठी ऑक्टोबर उजाडणार आहे. मात्र त्याआधी ऑगस्टपर्यंत या पुलाची एक बाजू उभारण्याचे नियोजन एमएसआरडीसी ने केलं आहे. त्यानंतर पुलाच्या एका बाजूवरून दोन्ही दिशेची वाहतूक सुरू केली जाणार आहे अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. सद्यस्थितीत शेवटच्या टप्प्यातील 97% काम पूर्ण झाली आहेत.

7-8 तासांत पूर्ण होणार प्रवास (Samruddhi Mahamarg)

एकेकाळी मुंबई ते नागपूर हे अंतर कापण्यासाठी 16-20 तास लागत होते. मात्र, समृद्धी महामार्गामुळं हे अंतर 7-8 तासांत पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्गाने मुंबई आणि नाशिककरांना इगतपुरीतून येथून येणाऱ्या वाहनांना थेट नागपूरपर्यंत आठ तासात पोहोचणे शक्य होणार. हा मार्ग खुला झाल्याने विदर्भ मराठवाड्याला मुंबईच्या वेशीपर्यंत वाहने जलद गतीने प्रवेश करण्याचा मार्ग (Samruddhi Mahamarg) सुकर झाला आहे.