हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Mahamarg) मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच सिंदखेडराजा येथे एक खाजगी ट्रॅव्हल्सला आग लागून अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नयेत यासाठी काय उपाययोजना कराव्यात यावर सर्व स्तरात चर्चा सुरु होती. अशात आता समृद्धी महामार्गावर मृत्यू होऊ नये म्हणून सिंदखेडराजाजवळ महामृत्युंजय यंत्र बसवले असल्याची माहिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
महामृत्युंजय यंत्रामुळे (Mahamrutyunjay Yantra) आजूबाजूच्या १० किमी च्या परिसरात एकही अपघात होणार नाही. अन अपघात झालाच तर त्यामध्ये कोणाचा मृत्यू होणार नाही असा दावा सदर व्हिडीओ मध्ये करण्यात आला आहे. यांनतर हे खरे असेल तर मग संपूर्ण देशभरच अशी यंत्रे का लावली जात नाहीत असा खोचक प्रश्न नेटकरी विचारत आहेत. लोकांना वेड्यात काढणाऱ्या अशा भोंदूगिरीवर प्रशासन कधी कारवाई करणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
स्वामी समर्थ सेवा केंद्र समन्वयक यांचा दावा
दरम्यान, गेल्या महिन्यात समृद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा (Samrudhhi Mahamarg Accident) इथे झालेल्या भीषण अपघातात अनेक लोकांचा जळून मृत्यु झाला. त्या तिथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सिंदखेड राजा यांच्या मार्फत महामृत्युंजय यंत्र बसवण्यात आले आहे आणि या मुळे आजूबाजूच्या पाच दहा किलोमीटर मध्ये अपघात होणार नाही तसेच अपघात झाला तर मृत्यू होणार नाही असा दावा तिथल्या स्वामी समर्थ सेवा केंद्र समन्वयक यांनी केला आहे.
अंनिसने केली कारवाईची मागणी
दैवी शक्तीचा दावा करणे आणि त्या मधून लोकांना फसवणे आणि ठकवणे हा जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. बुलढाणा पोलीस अधीक्षकांनी या वर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे अशी मागणी अनिस तर्फे करण्यात आली आहे. स्वामी समर्थ साधकांनी देखील या गोष्टीचा निषेध करणे आवश्यक आहे. आपल्याला आधारभूत वाटणारी श्रद्धा असण्याचे स्वतंत्र आपली राज्य घटना आपल्याला देते पण आणि लोकांची फसवणूक करणाऱ्या अंधश्रध्दाना विरोध करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे असे मत डॉ हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले आहे. Samrudhhi Mahamarg