Samsung Galaxy A16 5G लाँच ; शानदार फीचर्ससह 6 वर्षे सिक्युरिटी अपडेट्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सॅमसंग या कंपनीने भारतात नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे . त्यांच्या या नवीन माँडेलचे नाव Samsung Galaxy A16 5G असून , हा फोन ग्राहकांना चार रंगात उपलब्ध होणार आहे. तसेच हा फोन Android 14 वर चालत असून , शानदार अपग्रेड्स व सहा वर्षापर्यंत सिक्युरिटी अपडेट्स मिळतील. त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात या स्मार्टफोनकडे आकर्षित होत आहेत. SBI आणि Axis क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी या फोनची खरेदी केल्यास त्यांना 1 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

फोनचे फीचर्स

या फोनला 6.7 इंचाचा FHD+ इनफिनिटी U सुपर AMOLED डिस्प्ले असून , ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव मिळणार आहे. याचे रिझोल्यूशन 1080×2340 पिक्सल्स आहे . प्रोसेसर बदल सांगायचं झालं तर , मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 ने सुसज्ज असल्याचे दिसून येते. यामध्ये डेटा ठेवण्यासाठी 8GB रॅम त्याचसोबत 128GB व 256GB स्टोरेजचा पर्यायही ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. स्टोरेजचे अजून एक वैशिष्ट असे कि , एसडी कार्डद्वारे 1.5TB पर्यंत स्टोरेज वाढवता येईल . तसेच हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड 14 वर चालत असून , त्यावर One UI 6.0 ची लेयर आहे. फोटो काढण्यासाठी यात 50 मेगापिक्सलचा कॅमेरासुद्धा दिला आहे. तसेच 5MP अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी प्रेमींसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. सुरक्षेसाठी फोनला फिंगरप्रिंट सेंसर देखील उपलब्ध करून दिले आहे.

रंग आणि किंमत

फोनला 5000 एमएएचची बॅटरी असून , 25 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे .या फोनचे वजन 192 ग्रॅम आहे . त्याचबरोबर तो IP54 रेटिंगसह येत असून , ज्यामुळे तो धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करू शकतो. हा फोन काळ्या , निळ्या , सोनेरी आणि फिकट हिरव्या रंगात मिळणार आहे. मॉडेल नुसार फोनची किंमत आहे. 8GB+128GB मॉडेलची किंमत 18999 रु तर 8GB+256GB मॉडेलची किंमत 21999 रु एवढी आहे . हा फोन ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने मिळणार आहे . अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर हा फोन मिळू शकतो .