हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samsung Galaxy F14 5G: जर आपण एखादा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याणार असाल तर यासाठी फ्लिपकार्टवर अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. वास्तविक या ई-कॉमर्स वेबसाइटवर बिग बचत धमाल सेल सुरू झाला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना अनेक जबरदस्त ऑफर्स आणि सवलती दिल्या जात आहेत. ज्या अंतर्गत Samsung Galaxy F14 5G हा स्मार्टफोन चांगल्या ऑफर्सद्वारे विकत घेता येईल.
नुकतेच या स्मार्टफोनचे एक बॅनर फ्लिपकार्टवर लाइव्ह झाले आहे. ज्यावरून हा स्मार्टफोन 12,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतींत खरेदी करता येईल. तसेच तो 1,444 रुपये प्रति महिना EMI द्वारेही खरेदी करता येईल. तसेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर HDFC बँकेच्या कार्ड अंतर्गत 1,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंटही उपलब्ध आहे. याशिवाय एक्सचेंज ऑफर अंतर्गत यासाठी चांगली किंमत देखील मिळू शकेल. Samsung Galaxy F14 5G
Samsung Galaxy F14 5G च्या फीचर्स बाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसहीत Exynos 1330 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच एसडी कार्डच्या मदतीने या फोनचे स्टोरेज वाढवता देखील येते.
Samsung Galaxy F14 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.6-इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन 5G Android 13 बेस्ड OneUI कस्टम स्किनवर काम करतो. यामध्ये क्लिअर व्हॉईस कॉलिंगसाठी एआय बूस्ट फीचर देण्यात आले आहे.
या फोनमध्ये पॉवरसाठी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसहीत 6,000mAh बॅटरी दिली गेली आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये 5G, 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ आणि USB टाइप-सी पोर्टसाठी सपोर्ट दिला गेला आहे.
कॅमेऱ्या बाबत बोलायचे झाल्यास या फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनच्या समोरील बाजूस 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/samsung-galaxy-f14-5g-goat-green-128-gb/p/itm032d1a69999cc
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन भाव पहा
Honda SP125 ही बाईक भारतात 2 व्हेरिएंटमध्ये लॉन्च, पहा किंमत अन् फीचर्स
Cibil Score : सिबिल स्कोअर फ्री मध्ये कसा चेक करायचा? जाणून घ्या कामाची गोष्ट
Business Idea : राखेपासून विटा बनवण्याच्या व्यवसायाद्वारे दरमहा मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
Investment Tips : डेट म्युच्युअल फंड की एफडी यांपैकी जास्त रिटर्न कुठे मिळेल ? तज्ज्ञांकडून समजून घ्या