Samsung Galaxy M14 4G : प्रसिद्ध ब्रँड Samsung चे मोबाईल भारतात जास्त प्रसिद्ध आहेत. अगदी सुरुवातीच्या काळापासून Samsung मोबाईलवर भारतीय ग्राहक डोळे झाकून विश्वास ठेवत असल्याचे आपण बघितलं असेल. कंपनी सुद्धा नवनवीन मोबाईल बाजारात आणत ग्राहकांच्या या विश्वासाला आणखी बळ देते. आताही कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नवा मोबाईल लाँच केला आहे. Samsung Galaxy M14 4G असे या स्मार्टफोनचे नाव असून याची किंमत १० हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. म्हणजेच अगदी सर्वसामान्य ग्राहकाला सुद्धा परवडेल अशा किमतीती सॅमसंगने हा मोबाईल बाजारात आणला आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात…
6.7 इंचाचा डिस्प्ले –
Samsung Galaxy M14 4G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह कंपनीने 6.7 इंचाचा FHD+ PLS LCD डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाइन देण्यात आले आहे. या बजेट मोबाईल मध्ये Qualcomm Snapdragon 480 प्रोसेसर देण्यात आला असून हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित OneUI वर काम करतो. हा मोबाईल 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे.
कॅमेरा – Samsung Galaxy M14 4G
Samsung Galaxy M14 4G मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. यामध्ये पाठीमागील बाजूला 50MP प्राथमिक कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर कॅमेरा मिळतोय. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 13MP कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी या मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 25W यूएसबी टाइप सी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती?
मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy M14 4G च्या 4GB RAM + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 8,499 रुपये आहे, तर 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 11,499 ठेवण्यात आली आहे. हा मोबाईल आर्क्टिक ब्लू आणि सॅफायर ब्लू या रंगात तुम्ही खरेदी करू शकता.