Samsung Galaxy M15 5G : Samsung ने स्वस्तात लाँच केला 5G मोबाईल; 6000mAh बॅटरी 50MP कॅमेरा आणि बरंच काही….

Samsung Galaxy M15 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Samsung Galaxy M15 5G : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड सॅमसंगने कोणाच्या ध्यानी मनी नसताना आपला नवीन आणि स्वस्तात मस्त 5G मोबाईल बाजारात लाँच केला आहे. या मोबाईल मध्ये 6000mAh बॅटरी 50MP कॅमेरा सह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. मोबाईलची किंमत कंपनीने जाहीर केली नसली तरी १५ हजार रुपयांच्या किमतीत तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.,….

Samsung Galaxy M15 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला. या डिस्प्ले मध्ये 800 nits पर्यंत ब्राइटनेस मिळतोय. मोबाईलचा लूक बघितला तर सेम Galaxy M14 सारखाच हा स्मार्टफोन दिसतोय. कंपनीने या मोबाईल मध्ये Octa core MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर दिला असून Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर हा स्मार्टफोन काम करतो. मोबाईल मध्ये 4GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते.

कॅमेरा – Samsung Galaxy M15 5G

स्मार्टफोनच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy M15 5G मध्ये पाठीमागील बाजूला 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 5-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉलसाठी समोरील बाजूला 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.पॉवरसाठी या मोबाईल मध्ये 6,000mAh बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, Galaxy M15 5G मध्ये 3.5mm हेडफोन जॅक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. या मोबाईल साठी सॅमसंगने 5 वर्षांसाठी चार अँड्रॉइड अपडेट्स आणि सिक्युरिटी पॅचचे आश्वासन दिले आहे.