कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शेडशाळ इथल्या विविध शेती गट नंबरमध्ये परवान्यापेक्षा ९ हजार ८९५ ब्रास जादा माती उत्खनन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरोळ तहसील विभागाने शेडशाळ येथील १० शेतकरी तसेच अंकली, हरिपूर येथील वीटभट्टी व्यावसायिक अशा २३ जणांना ४ कोटी ३५ लाख रुपयांच्या दंडाच्या नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, तहसीलदार अपर्णा मोरे यांनी कनवाड येथील बेकायदा माती उत्खननावर दंडात्मक कारवाई करून रस्त्याची नुकसान भरपाई घ्यावी. शेडशाळमधील शेतकरी व माफियांवर दंडात्मक कारवाईच्या नोटिसांप्रमाणे कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलन अंकूश व रयत क्रांती संघटनेचे धनाजी चुडमुंगे आणि दिलीप माणगावे यांनी दिला आहे.
शेडशाळ येथील शेतकरी गौस लाजम मुर्तुजा पाटील, आबासाहेब पाटील, रावसाहेब कल्याणी, बसवलिंग कोल्हापुरे, आबालाल पाटील, विद्याधर यळगुडे, विद्याधर कल्याणी, अजहिरोद्दीन पाटील, आबासो पाटील, कैलास गडगे, दिलीप कल्याणी, संजय बिडकर (कुरुंदवाड), महेश बोंद्रे, युवराज बोंद्रे (हरिपूर), वैभव खवाटे, महावीर पाटील, प्रदिप कुंभार, अनिल कुंभार, निशिकांत बोंद्रे, अमर पाटील, वसंत मगदूम (सर्व अंकली) यांना ४ कोटी ३५ लाखांच्या पाचपट दंड आकारणीच्या नोटीसा लागू केल्या आहेत.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.