अर्जुन आणि परिणीतीचा ‘संदीप और पिंकी फरार’ होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा या दोघांचा ‘संदीप और पिंकी फरार’ गेल्या वर्षातील अत्यंत चर्चेत आलेला चित्रपट आहे. त्यानंतर यावर्षी हा चित्रपट मार्च महिन्यामध्ये सिनेमा थिएटरमध्येही रिलीज झाला होता. मात्र, कोरोना महामारीच्या वाध्य संसर्गामुळे राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे सर्व सिनेमा थिएटर बंद करण्यात आले. या लॉकडाऊनमूळे हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर म्हणावे तसे यशही मिळवू शकला नाही आणि हवी तशी कामे देखील करू शकला नाही. त्यामुळे ही कसर भरून काढण्यासाठी ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रकाशित केला जाणार आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपट रिलीज होता होता राहिले आहेत. तर अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या ठरलेल्या तारखा निर्मात्यांनी पुढे ढकलल्या. निश्चितच लॉकडाऊनमुळे चित्रपटाच्या कमाईवर विशेष परिणाम होतो. तसेच प्रेक्षकांच्या मनोरंजनातही कसूरता राहते. त्यामुळे ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटांच्या निर्मात्यांनी आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचे पक्के केले आहे. ज्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट त्यावेळी बघता आला नव्हता, त्यांना आता त्या सर्व प्रेक्षकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहण्याचा आनंद मिळणार आहे.

‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट २०१८ साली पूर्ण तयारीनिशी प्रेक्षकांच्या भेटीस येण्याकरिता सज्ज झाला होता. गेल्यावर्षीच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाला असता. मात्र, कोरोनामुळे ते शक्‍य झाले नव्हते. या चित्रपटामध्ये अर्जुन कपूरचे नाव संदीप आणि परिणिती चोप्राचे नाव पिंकी असेल, असे स्वाभाविकपणे वाटू शकते. मात्र, मूळ चित्रपटात बरोबर उलटे आहे. अर्जुन कपूर हरियाणातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये दिसतो आहे. तर परिणिती चोप्रा कॉर्पोरेट विश्‍वातील एक महत्त्वाकांक्षी तरुणीच्या भूमिकेत दिसते आहे. आता या दोघांभोवती नेमके या चित्रपटाचे कथानक कसे फिरते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट स्वतःलाच पाहावा लागेल, तरच खरी मजा येईल.