काँग्रेसच्या संदीप गुळवेंचा ठाकरे गटात प्रवेश; पक्षप्रवेश होताच उमेदवारी ही जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. कालपासून नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या (Nashik Teachers Constituency) निवडणुकीसाठी अर्ज करण्यास ही सुरुवात झाली आहे. अशातच आज काँग्रेसचे नेते संदीप गुळवे यांनी उद्धव ठाकरेंच्या गटात (Uddhav Thackeray Group) प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर लगेच ठाकरे गटाकडून संदीप गुळवे (Sandip Gulave) यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर संदीप गुळवे यांनी म्हटले आहे की, “माझा आज प्रवेश करून घेतला त्याबद्दल धन्यवाद देतो. आज माझा प्रवेश करून शिक्षकांची सेवा करण्याची संधी दिली आहे. हा विश्वास मी सार्थ ठरवेल. नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा मी जिंकून आणून आणेल. ही संधी मला दिली त्याबद्दल मी आभार मानतो” दरम्यान, संदीप गुळवे यांचा ठाकरे गटात प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत संदीप गुळवेंचा पक्षप्रवेश झाला. महत्त्वाचे म्हणजे, 1996 पासून संदीप गुळवे राजकारणात सक्रिय आहे. त्यांनी 1997 साली नाशिक महपाालिकेची निवडणूक लढवली होती. परंतु त्यात त्यांचा पराभव झाला होता. यानंतर ते सलग दहा वर्षे नाशिक महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य राहिले.