‘पैसे वाटताना जर कोणी दिसलं तर हातपाय तोडू’- संदीप क्षीरसागर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी । ‘प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करावा. अन्यथा आम्हाला जर कोणी पैसे वाटताना दिसले तर त्याचे सरळ हातपाय तोडू’ असा इशारा बीड मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी दिला. बीड शहरातील खंडेश्वरी मंदिर परिसरात पैसे वाटप करणाऱ्या सुरेश बन्सोडे यांस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यावेळी प्रशासनाला दमदाटी करत क्षीरसागर यांनी स्फोटक वक्तव्य केलं.

दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर खूपच आक्रमक झाले होते. त्यांनी आपला संताप प्रशासनावर व्यक्त केला. सोबतच उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना कारवाई करण्याबाबत आग्रह केला. तसचं निवडणूक आयोगाकडे वारंवार तक्रारी देवून देखील असे प्रकार समोर येत असतील तर काय ?असा थेट सवाल केला. तुम्ही जर पैसे वाटणाऱ्यावर कारवाई करणार नसाल तर आम्हाला असे करताना जर कोणी दिसले तर त्यांचे हातपाय तोडू असा धमकी वजा इशारा क्षीरसागर यांनी दिला.

बीड मध्ये काका जयदत्त तर पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यात मुख्य लढत आहे. अशा स्तिथीत पुतण्याने आता काकांवर पैसे वाटपाचा गंभीर आरोप केला आहे. मात्र थेट पोलिस अधिकाऱ्यांसमोर हातपाय तोडण्याची भाषा केल्यानं संदीप क्षीरसागर देखील अडचणीत सापडले असून हा वीडियो मोठ्या प्रमाणात वायरल होतो आहे. मात्र या घटनेमुळ काका पुतण्याचा संघर्ष अतिशय टोकाला गेल्याच दिसून येत आहे.

Leave a Comment