आज्जीच्या प्रेम संबंधात गेला नातीचा जीव

Thumbnail
Thumbnail
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंचवटी | आजीच्या प्रेम संबंधातून नातीला जीव गमवावा लागल्याची अजब घटना नाशिक जिल्ह्यातील पंचवटी या ठिकाणी घडली आहे. आजी संगीता शिवरे सोबत असलेल्या वैमनस्यातून जल्लाउद्दिन खान याने रात्री तिच्या अंगावर राॅकेल ओतून पेटवून दिले. या घटनेत संगीता शेवरे भाजली आणि त्यांची माहेरी आलेली मुलगी प्रीती शेंडगे (वय २०) गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. तर प्रीती शेंडगे यांची नऊ महिण्यांची मुलगी सिद्धी रामेश्वर शेंडगे हिचा दुर्देवी अंत झाला आहे.

हाती आलेल्या माहीतीनुसार, संगीता शिवरे (वय ३८) हिचे जल्लाउद्दिन खान याच्या सोबत अनैतिक संबंध होते. संगीता आणि जल्लाउद्दिन यांच्यात काही कारणांनी कलह झाले आणि त्या कलहाचे रूपांतर मोठया वादात झाले. त्यातून सोमवारी पहाटे चारच्या सुमारास जल्लाउद्दीन संगीताच्या घरात घुसला आणि त्याने झोपेत असणाऱ्या संगीताच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले.

रामेश्वर शेंडगे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पंचवटी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. सदर घटनेतील पीडित संगीता शेवरे हिचा पुणे पोलीसांनी जबाब नोंदवून घेतला असून पंचवटी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.