वंदे भारतच्या तिकीट विक्रीत सांगलीने केला विक्रम ; रेल्वेला मिळाले सव्वा लाखांचे उत्पन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पूर्णपणे स्वदेशी असलेल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ची अख्ख्या देशभर चर्चा आहे. अद्यापही देशात असे बरेच भाग आहेत जिथे वंदे भारत एक्सप्रेस पोहचहली नाही. या गाडीला संपूर्ण देशातून मागणी असताना कोल्हापूर सांगली भागातील प्रवाशांची मागणी पूर्ण झाली असून १६ सप्टेंबर रोजी या भागात पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावली. अगदी पहिल्याच दिवशी या गाडीला चांगला प्रतिसाद दिल्याचे समोर आले असून त्याबाबतची आकडेवारी समोर आली आहे.

रेल्वेला मिळाला सव्वा लाखांचा उत्पन्न

पहिल्याच दिवशी सांगलीकरांनी वंदे भरात एक्सप्रेसला भरभरून प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं आहे. पहिल्याच दिवशी सांगली -पुणे आणि पुणे- सांगली या मार्गावर वंदे भारतच्या दोन गाड्यांमध्ये एकूण 175 तिकीट काढली गेली आणि यातून रेल्वेला सव्वा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

वंदे भारतला सांगलीकरांचा भरभरून प्रतिसाद

हुबळी सांगली पुणे वंदे भारत एक्सप्रेस पहिल्या दिवशी सांगली स्थानकातून शंभर तिकिटांची विक्री झाली. गाडी क्रमांक २०६६९ हुबळी सांगली वंदे भारत या गाडीला सांगली स्टेशन वरून सकाळी सहा वाजेपर्यंत 90 तिकीट विकली गेली होती. तर सकाळी सात ते सव्वानऊच्या दरम्यान सांगली स्टेशन वरून वंदे भारत सुटण्याच्या आधी करंट बुकिंग मध्ये आणखी दहा-बारा तिकिटांची विक्री झाली. त्यामुळे एकूणच सांगलीकरांनी वंदेभरात एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. याबरोबरच एकाच फेरीत 100 तिकिटांची विक्री पार केल्यामुळे एक नवा विक्रम हे सांगलीच्या नावावर नोंदवला गेला आहे याशिवाय पुणे सांगली कोल्हापूर वंदे भारत गाडीत पुणे ते सांगली या परतीच्या मार्गावर 75 तिकीट यांची विक्री झाली.

सांगलीतून चांगली तिकिटांची विक्री झाली असली तरी मिरज आणि कोल्हापूर काही मागे नाही. कारण या दोन्ही स्थानकांमधूनही वंदे भारत एक्सप्रेसला मोठा प्रतिसाद लाभला करंट बुकिंगचा विचार केला तर कोल्हापूरनेही शतक गाठले कोल्हापूरची तिकीट विक्री एकाच फेरीची आहे. त्यामुळे इथून पुढे देखील सांगली कोल्हापूर या भागातून सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.

तिकिटविक्रीची आकडेवारी

सांगली १७५
मिरज १३०
बेळगाव ११०
कोल्हापूर ९४
हुबळी २६
धारवाड २५
सातारा १०
(यात करंट बुकिंगचा समावेश नाही)