सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सुरक्षिततेचा प्रश्न
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
आयर्विन पुलावरील पाईलपलाईचा भराव खचू लागला आहे परिणामी पुलाला काल भगदाड पडले होते. आज सकाळी ज्या ठिकाणी भगदाड पडले होते त्याच ठिकाणि भाला मोठा खड्डा पडल्याचं निदर्शनास आलं. काल दुपारी महापौर संगीता खोत यांनी पुलाची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या मात्र बांधकाम विभागाने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज याच ठिकाणी भला मोठा खड्डा पडल्याची धक्कादायक बाब समोर आली. काल छोटे असणारे भगदाडाच्या ठिकाणी खड्डा पडल्याने आता संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित विभागाने वेळीच उपाययोजना केली नाही तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे.
आयर्विन पुलाला १९९८ मध्ये पर्यायी बायपास पूलही बांधण्यात आला. परंतु तो बायपासच ठरला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून डागडुजी करीत पुन्हा वापरात आणण्यात आला. मात्र काल पुन्हा पुलाला भगदाड पडल्याचं निदर्शनास आलं. पुलाच्या फुटपाथवर गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ती सांगलीवाडीच्या पाणीपुरवठ्याचा भार सोसते. परंतु गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ पुन्हा पुलाच्या स्लॅबचे तुकडे पडू लागले आहेत. पुलाच्या पिलरसह खालील कमानीच्या सळ्याही गंजून त्याचा स्लॅब कोसळू लागला आहे.
पुलाच्या पाईपलाईनजवळच काल भराव खचून मोठे भगदाड पडले. आज त्याच ठिकाणी भला मोठा खड्डा पडला आहे. मात्र अद्याप याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. काल असणारे भगदाड हे लहान होते आज मोठा खड्डा पडल्याने पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याच बरोबर लहान असणार भगदाड हे खड्ड्यात रूपांतर कस झालं? का कोणी खोडसाळ पणाने केलेलं हे कृत्य आहे हे पाहण्याची आवश्यकता आहे.