सांगलीत कोरोना रुग्णाचा मृत्यू, जिल्ह्यात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरज येथील शासकीय कोरोना रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या विजयनगर येथील ४७ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या व्यक्तीवर उपचारासाठी हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने शर्तीचे प्रयत्न केले मात्र त्याला यश आलं नाही. आज त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

सांगली शहरामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आज पर्यंत आढळला नव्हता. मात्र, आज सांगली शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली होती. लॉकडाऊन पासून शिथिलतेच्या प्रतीक्षेत असतानाच शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता वाढली आहे. हा रुग्ण विजयनगर येथील असून तो सांगलीतील गणपती पेठेतील एका सहकारी बँकेत क्लार्क या पदावर कामाला होता. या व्यक्तीला निमोनियाची लक्षणे आढळताच त्याला मिरजेतील शासकीय कोरोना रुग्णालयात उपचारासाठी १७ एप्रिल रोजी दाखल केले होते. त्रास जाणवू लागल्यामुळे, त्यांचे स्वाब तपासणी साठी पाठवण्यात आला होता, आणि त्याचा रिपोर्ट पोझेटिव्ह आला. रुग्णालयात येण्या अगोदरच त्याला ज्यास्त त्रास जाणवू लागला होता. त्याला अधिकच त्रास होत असल्याने त्या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

या व्यक्तीवर उपचारासाठी हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने शर्तीचे प्रयत्न केले मात्र त्याला यश आलं नाही. इस्लामपूर आणि विजयनगर परिसर हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २७ जणांना कॉरंटाईन करण्यात आलं आहे. त्यांच्या स्वाबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान कोरोना बाधित सांगली शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Leave a Comment