सांगली जिल्हा पुन्हा रेड झोनमध्ये, आज पुन्हा पाच जण कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला असून शनिवारी एकाच दिवशी तब्बल पाच रुग्ण आढळले. सद्यस्थितीत केळ्यात एकूण १७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा पुन्हा रेड झोन’मध्ये गेला आहे. साळशिंगे येथे गुजरातमधील अहमदाबाद मधून आलेल्या कोरोनाबाधित महिलेचा आठ वर्षाचा पुतण्या आणि त्याच्या संपर्कात आलेले भिकवडी खुर्द मधील तब्बल तीन जणांना कोरोनाची लागण झाली. एकाच गावातील तिघांना कोरोना झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुपवाड मधील लक्ष्मीनगर येथे एक कोरोनाचा रुग्ण आढळला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील अक्टीव्ह रुग्णांची 17 झाली.

सरकारने परराज्यातून येणाऱ्या लोकांना परवागनी दिली आहे, त्यामुळे बाहेर नोकरी, व्यवसायासाठी असलेले लोक जिल्ह्यात येत आहेत. गुजरातमधील अहमदाबाद येथून खानापूर आणि तासगाव तालुक्यातील सोळा प्रवासी आले आहेत. त्यामध्ये साळशिंगे येथे पती-पत्नी आली होती. त्या दोघांना गावामध्ये होम क्वॉरंटाईन करीत त्यांची विटा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी करण्यात आली. तीस वर्षीय महिलांमध्ये कोरोना बाबतची काही लक्षणे ग्रामीण रुग्णालयात आढळली. त्यामुळे महिला आणि तिच्या पतीला मिरज येथील कोविड रुग्णालयात दाखल केले होते. तेथे कोरोना तपासणीसाठी त्या दोघांचे स्वब घेतले होते. ती महिला पॉझिटिव्ह असल्याचे 10 मे रोजी स्पष्ट झाले. मात्र त्या महिलेचा पतीची चाचणी निगेटिव्ह आला होता. सात दिवसानंतर त्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील 15 जणांचे स्बॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी चौदा जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र आठ वर्षीय पुतण्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली.

आठ वर्षीय मुलाच्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द येथील संपर्कातील तीन जणांचा कोरोनाचा अहवाल रात्री उशिरा आला असून तिघेही पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. भिकवडी खुर्दमध्ये गुजरातमधून आलेला एक जण दोन दिवसापूर्वी कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्याच्या संपर्कातील लोकांना कडेगावमध्ये संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्याचे शुक्रवारी कोणाच्या तपासणीसाठी नमुने घेण्यात आले होते त्या तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.गावातील चौघांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाल्याने संपूर्ण गाव केले होते. त्यानंतर पुन्हा एकाच घरातील दोघे कोरोनाबाधित असल्याने गावामध्ये भितीचे वातावरण पसरले होते. प्रशासनाने खबरदारीचा उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment