सांगली जिल्ह्यात रुग्णसंख्या स्थिरच : नवे १३०४ पाॅझिटीव्ह तर १ हजार २९१ कोरोनामुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर होत असताना गुरुवारी नवे १ हजार ३०४ रुग्ण आढळले तर ३४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चोवीस तासात १ हजार २९१ जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे १३४ रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात ८५, कडेगाव १०३, खानापूर ११७, पलूस २८, तासगाव १८९, जत १५८, कवठेमहांकाळ ९०, मिरज १२५, शिराळा ६२ आणि वाळवा तालुक्यात २१३ रुग्ण आढळले.

कोरोना संशयित रुग्णांची मागील चोवीस तासात जिल्ह्यातील ५ हजार ९२८ रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्या २०७३ पैकी ४५६ बाधित तर ३८५५ अँन्टीजेन चाचणीमध्ये ९०३ जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यामध्ये मिळून १३०४ जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील ३४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खानापूर तालुक्यातील ७, सांगली शहर ४, मिरज शहर २, तासगाव आणि जत तालुक्यातील प्रत्येकी ३, मिरज तालुक्यातील ५, कवठेमहांकाळ आणि शिराळा प्रत्येकी २, वाळवा ४, आटपाडी आणि पलूस तालुक्यातील प्रत्येकी एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाला. नव्या रुग्णांपेक्षा १ हजार २९१ बाधित रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली.

महानगरपालिका क्षेत्रात रुग्णसंख्या कमी झाली. नव्याने १३४ रुग्ण आढळून आले. सांगली शहरात ६९ तर मिरज शहरात ६५ रुग्ण आढळले. याशिवाय आटपाडी तालुक्यात ८५, कडेगाव १०३, खानापूर ११७, पलूस २८, तासगाव १८९, जत १५८, कवठेमहांकाळ ९०, मिरज १२५, शिराळा ६२ आणि वाळवा तालुक्यात २१३ रुग्ण आढळले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ३९, सोलापूर ०४, कर्नाटक ०८, सातारा २, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येकी एक रुग्ण आढळले. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 1 लाख ५ हजार ५११ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी ३ हजार ८० व्यक्तींचा मृत्यू झाला असून ८८ हजार ५७८ जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १३ हजार ८५३ रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यापैकी १० हजार ८७६ बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.

Leave a Comment