सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
महानगरपालीका मिरज येथील सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ लिपीक अजित धनपाल राजमाने यास १ हजार रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगहात पकडले.
सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या मिरज विभागात अजित धनपाल राजमाने हे विवाह नोंदणी विभागामध्ये कनिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांचे मुलीचा विवाह झाला असून सदर विवाहाची नोंद महानगरपालीका मिरज येथे होवून विवाह नोंदीचे प्रमाणपत्र मिळणे करीता तक्रारदार यांनी महानगरपालिका मिरज कार्यालयातील विवाह नोंदणी विभागात अर्ज दिला होता. तक्रारदार यांचे मुलींचे लग्नाची नोंद होवून विवाह नोंदीचे प्रमाणपत्र देण्याकरीता राजमाने यांनी शासकीय फि व्यक्तीरीक्त १ हजार रूपये जादा मागितले. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागामध्ये तक्रार केली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लाजलुचपत प्रतिबंध विभागाच्या पडताळणीमध्ये अजित धनपाल राजमाने कनिष्ठ लिपीक यांनी तक्रारदार यांच्याकडे १ हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालीका मिरज येथे सापळा लावून अजित राजमाने हे १ हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाच सापडले. त्यांच्या विरुध्द मिरज शहर पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.