मिरजेत अवैध सावकारीतून कोट्यवधी रुपयांची वसुली करणाऱ्या २ फरार आरोपींना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । मिरजेतील तंतूवाद्य व्यवसायिक संजय मधुकर मिरजकर याच्याकडून ५१ लाखांच्या कर्जापोटी तब्बल दोन कोटींचे व्याज वसुल करण्यात आले. यासंदर्भात गुन्हा दाखल झालेले संतोष कोळी व गायकवाड या दोघा फरारी आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली. अन्य ६ सावकार अद्याप फरारीच आहेत. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या सावकरांवर कारवाईचा फास आवळला असून आरोपींना फरारी घोषित करण्याची प्रक्रिया सुरु केल्याने संतोष कोळीसह दोघेजण पोलिसात हजर झाले.

शनिवार पेठेतील तंतूवाद्य विक्रेते वसंजय मिरजकर यांनी हॉटेल खरेदीसाठी मिरजेतील खाजगी सावकारांकडून १० ते ४० टक्के व्याजदराने कर्ज घेतले होते. मिरजकर यांनी दोन वर्षात ५१ लाखांच्या कर्जापोटी या खासगी सावकारांना तब्बल दोन कोटींचा व्याज दिल्यानंतरही खासगी सावकारांनी वसुलीचा तगादा लावला होता.

सावकारांनी मिरजकरांना किडनी काढून घेण्याचीही धमकी दिली होती. सावकारांच्या जाचाला कंटाळून संजय मिरजकर घरातून बेपत्ता झाले होेते. याबाबत कुटूंबियांच्या तक्रारीनंतर संतोष कोळी, शंतनू कोळी, सचिन गायकवाड, सुरेश लांडगे, जितेंद्र ढोले, शैलेंद्र ढोले, सुरज दिवसे, विजय पाटगांवकर या खासगी सावकारांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment