मंदिरात चप्पल घालण्यावरुन २ गटात तुफान हाणामारी, गोपीचंद पडळकरांच्या भावावर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली । मंदिरात चप्पल घालण्यावरुन दोन गटात तुफान मारामारी झाली आहे. सांगलीतील मसाळवाडी गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मसाळवाडीतील एका मंदिरात काही जणांनी चप्पल घालून प्रवेश केला. या घटनेनंतर सांगलीतील दोन गटात तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. यात दोन्ही गटांनी लाथा-बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. तसेच यावेळी आजूबाजूला गाड्यांच्या काचाही फोडल्या आहेत.

याप्रकरणी आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही गटातील 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मंदिरात चप्पल घालण्यावरुनच ही हाणामारी झाली की याचे काही इतर कारण होते, याचा तपास पोलीस करत आहे. (Sangli two group fight for some reason)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment