हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानी फलंदाज शोएब मलिकनं ( Shoaib Malik) शनिवारी ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एक मोठा विश्वविक्रम केला.शोएब मलिकने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.अशी कामगिरी करणारा तो जगातील फक्त तिसरा फलंदाज ठरला आहे. पाकिस्तानात सुरू असलेल्या नॅशनल ट्वेंटी-20 कप मधील सामन्यात शोएब मलिकनं या विश्वविक्रमाला गवसणी घातली. या विक्रमानंतर शोएब मलिकची पत्नी अन् भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हीनं कौतुकाचं ट्विट केलं.
खिबर पख्तूनख्वा संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मलिकनं शनिवारी 44 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकारांसह 74 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर संघानं 6 बाद 154 धावांपर्यंत मजल मारली. या खेळीनं मलिकला ट्वेंटी-20 क्रिकेटमधील जगातील तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनवले. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा तो जगातील तिसरा फलंदाज, तर आशियातील पहिलाच फलंदाज ठरला.
शोएब च्या या भीमपराक्रमावर त्याची पत्नी आणि भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झा खुपच खुश झाली आहे. सानियाने ट्विट करत शोएबच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. सानियानं ट्विट केलं की,”संयम, अथक परिश्रम, त्याग आणि विश्वास म्हणजे शोएब मलिक.. तुझा अभिमान.
Shoaib Malik today became only the third player to go past 10,000 runs in T20 cricket 🎉
Only Chris Gayle and Kieron Pollard have more runs than him!#NationalT20Cuppic.twitter.com/dmncYOvhIw
— ICC (@ICC) October 10, 2020
आतापर्यंत केवळ ख्रिस गेल ( 13296 ) आणि किरॉन पोलार्ड ( 10370) यांनाच हा पराक्रम करता आला आहे. मलिकनं 395 सामन्यांत ही कामगिरी करून दाखवली. त्याच्या नावावर ट्वेंटी-20त 62 अर्धशतकं आहेत. नाबाद 95 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. भारताचा विराट कोहली ( 9033) आणि रोहित शर्मा ( 8853) या विक्रमात अनुक्रमे 7 व 8 व्या क्रमांकावर आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’