नवनीत राणांच्या आरोपांना पोलिसांचे प्रत्युत्तर; ‘तो’ व्हिडिओ ट्विट करत केली पोलखोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या कोठडीत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांकडून आपल्याला हिन दर्जाची वागणूक मिळत असून आपल्याला पाणी सुद्धा देण्यात आलं नाही असा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाला मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी प्रत्युत्तर देत राणांचा पोलीस स्टेशन मधील व्हिडिओच ट्विट केला आहे आणि नवनीत राणा यांच्या आरोपातील हवाच काढली.

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नवनीत राणा यांचा पोलीस स्टेशनमधील एक व्हिडिओ शेअर करत एकप्रकारे पोलखोलच केली आहे. या व्हिडिओमध्ये राणा दाम्पत्य हे चहा पिताना दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओ मध्ये राणा दाम्पत्याच्या चेहऱ्यावर कोणताही ताणतणाव दिसत नाही. संजय पांडे यांनी यावेळी आम्ही आणखी काय बोलू का?? अस म्हंटल आहे.

नवनीत राणा यांनी काय केला होता आरोप?

नवनीत राणा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला होता. आपण मागासवर्गीय असल्याने पोलीस स्टेशन मध्ये मला रात्रभर पाणीही दिले नाही. पाणी मागितल्यामुळे मला जातीवाचक शिवीगाळ केली. मी अनुसूचित जातीची आहे, यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्कही नाकारण्यात आला तसेच वॉश रूम सुद्धा वापरून दिले नाही असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला होता तसेच यासंदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले होते.