संजूच्या ‘कमली’ ने मित्राला दिला धीर ; म्हणाला कि संजू ‘वाघ’ आहे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संजय दत्तच्या गंभीर आजारामुळे त्यांचे कुटुंब, चाहते आणि मित्र चिंतेत पडले आहेत. तथापि, प्रत्येकाला खात्री आहे की संजय नेहमीप्रमाणे या वेळी सर्व अडचणींना मात देऊन लवकरच ठीक होईल. संजय दत्तचा सर्वात चांगला मित्र परेश गिलानी याने संजय दत्त साठी सोशल मीडियावर खूप भावनात्मक पोस्ट लिहून त्याला प्रोत्साहन दिले आहे.

संजय दत्तच्या बायोपिक मध्ये कमली नावाचा संजूचा मित्र म्हणजेच खऱ्या आयुष्यातील परेश गिलानी हा आहे.संजू या बायोपिक मध्ये त्यांचं पात्र विक्की कौशल यांनी केले होते. तथापि, चित्रपटातील त्याच्या पात्राचे नाव कमलेश म्हणजेच कमली असे आहे. संजय आणि परेश यांच्यात तेच भावनिक समीकरण आहे जे संजू या बायोपिक मधील रणबीर कपूर आणि विक्की कौशल यांच्यात होत.

परेश संजयबद्दल खूप भावनिक आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिले आहे – भावा, आम्हाला वाटले की आम्ही संपूर्ण मनोरंजन पार्क कव्हर केला आहे. विचार केला की हे आता बंद झाले आहे, परंतु मला वाटते की हे काम अजूनही संपलेले नाही. चला, आणखी एक रोमांचक प्रवास करण्यासाठी सज्ज होऊया.

https://www.instagram.com/p/CD750KyFZPu/?utm_source=ig_web_copy_link

अजून एक लढाई सुरू झाली आहे.एक अशी लढाई जी आपल्याला जिंकायलाच हवी आणि तू नक्की जिंकशील. आम्हाला माहीत आहे तू वाघ आहेस भावा तू वाघ आहेस.

Leave a Comment