अखेर ठरलं तर! विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंना उमेदवारी

Sanjay Khodke
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानपरिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे गटानंतर (Eknath Shinde Group) आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादीकडून संजय खोडके (Sanjay Khodake) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते आमदार सुलभा खोडके (Sulabha Khodake) यांचे पती आहेत. आज दुपारी संजय खोडके अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

महायुतीचे उमेदवार निश्चित

चंद्रकांत रघुवंशी यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली होती. त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. पुढे, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर रघुवंशी यांनीही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.

महायुतीने या निवडणुकीसाठी आपली रणनीती निश्चित करत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात जागावाटप निश्चित केले आहे. यामध्ये भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. पक्षाने संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून चंद्रकांत रघुवंशी यांना संधी मिळाली आहे.

दरम्यान, विधानपरिषदेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपली अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र, आघाडीच्या संख्याबळावर विचार करता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महत्वाचे म्हणजे, 27 मार्च रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपणार आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी कोणतेही राजकीय समीकरण बदलते का?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.