Monday, February 6, 2023

तर अशा वाघांकडे पाठिंब्यासाठी का गेला होतात? संजय पवारांचा संभाजीराजेंवर निशाणा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होता येत नाही अस म्हणता मग पाठिंब्यासाठी अशा वाघांकडे का आलात?? असा उलट सवाल करत शिवसेनेचे राज्यसभेचे पराभूत उमेदवार संजय पवार यांनी छत्रपती संभाजी राजेंवर निशाणा साधला. आम्हाला छत्रपती घराण्याबद्दल आदर आहे पण त्यांचा बोलवता धनी वेगळाच कोणीतरी आहे असेही ते म्हणाले.

संभाजीराजे हे आमचे छत्रपती आहेत. मात्र त्यांची शिवसेनेवरची टीका खपवून घेतली जाणार नाही. शिवसेनेचे वाघ हे जंगलातील आहेत. जर वाघाचं कातडं पांघरुन वाघ होता येत नाही तर अशा वाघांकडे पाठिंब्यासाठी तुम्ही का गेला होतात? तुम्हाला कोण बोलवायला आलं नव्हतं.अस संजय पवार यांनी म्हंटल.

- Advertisement -

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून आधार दिला. निवडणुकीत कुठे दगाफटका झाला त्याचा शोध वरिष्ठ घेत आहेत असे संजय पवार यांनी सांगितलं. तसेच इथून पुढे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे काम असेच सुरू ठेवीन असेही त्यांनी सांगितले.