मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे सोमय्यांचे षडयंत्र ; संजय राऊतांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून दिल्ली आज शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली. “ज्यावेळी मालमत्ता जप्त व्हायला लागली, त्यावेळी दिवसा संजय राऊत यांना भूत दिसायला आहे, अशी टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही किरीट सोमय्या व केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. “सोमय्या देशद्रोही असून देशाच्या नावावर त्याने चोरी केली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे सोमय्यांचे षड्यंत्र आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,किरीट सोमय्यांचे प्रकरण हे खुप भयंकर आहे. कसाब आणि अफजल गुरु इतकंच सोमय्यांचे प्रकरण भयंकर आहे. त्यामुळे सोमय्यांनी आता नौटंकी बंद करावी. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी काही व्यक्तींकडून पैसे गोळा केले जात आहेत. आणि त्याचे काम सोमय्यांकडून केले जात आहे.

मुंबईला केंद्रशासित करण्याचा भाजपकडून डाव आखला जात आहेत. आणि या डावात भाजपसह पाच लोकांचा सहभाग असून त्यांच्याकडून प्रेझेंटेशनही कर्यात आले आहे, असा गौप्यस्फोट यावेळी राऊत यांनी केला.