केंद्र सरकारला लाज वाटली पाहिजे…! ‘भारतरत्न’ पुरस्कारावरून शिवसेना नेते संजय राऊत यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी ।  देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘भारतरत्न ‘ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना व  मरणोत्तर भारतरत्न  पुरस्कार नानाजी देशमुख आणि डॉ. भूपेन हजारिका यांना जाहीर झाला. मात्र अनेक दिवसांपासून वीर सावरकर यांना हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून  मागणी होत असतांना आज ह्या पुरस्कारांची घोषणा झाली. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर जोरदार टीका करत , भारतरत्न नक्की कुणाला…? असा प्रश्न विचारला आहे. “आज नानाजी देशमुख, भुपेश हजारीका व प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न बनवले. वीर सावरकरांच्या नशीबी पुन्हा काळे पाणीच…शेम… शेम…”.

स्वातंत्रवीर सावकार यांच्या नशिबी पुन्हा काळ्या पाण्यातील शिक्षेप्रमाणे अजूनही मरणोत्तर यातनाच…!, त्यांच्या कार्याचा गौरव न करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा धिक्कार असो असे त्यांनी म्हंटले आहे.


 

Leave a Comment