बाबरी मशीद आम्हीच पाडली हे सांगण्याचं धाडस भाजप का दाखवत नाही?- संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘द इकॉनामिक टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत एक मोठं विधान केलं आहे. “भाजपा एक पक्ष म्हणून आणि त्यांचे वरिष्ठ नेते आतातरी बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी कारसेवकांच्या समूहाला दोष देण्यापेक्षा आतातरी बाबरी मशीद आम्हीच पाडली हे सांगण्याचं धाडस का दाखवत नाही?,” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी बाबरी मशीद प्रकरणावरून भाजपातील वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे.

‘द इकॉनामिक टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी राम मंदिर भूमिपूजन व बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यावर भाष्य केलं आहे. बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सीबीआय न्यायालयानं भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचे जबाब नोंदवून घेण्यासाठी अलिकडेच तारीख निश्चित केली. त्याविषयी बोलताना राऊत म्हणाले,”आडवाणीजी व जोशीजी यांना या वयात सीबीआय न्यायालयात ओढलं जात असताना, मला हे कळत नाही की, केंद्र सरकार हा खटला का सुरू ठेवत आहे? हे अक्षम्य आहे,” असं राऊत म्हणाले.

“सर्वोच्च न्यायालयानं राम मंदिराच्या उभारणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट निकाल दिला आहे. मग वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि इतरांना न्यायालयात जाऊ देण्यापेक्षा बाबरी मशीद विध्वंस प्रकरण बंद करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारनं कशामुळे रोखली आहे?,” असा सवाल राऊत यांनी उपस्थित करत मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment