हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न करू नका; राऊतांचा भाजपवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। सोमवारी झालेल्या वादळी चर्चेनंतर अखेर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सुमारे एक तास तपशीलवार भाषण करावे लागले. त्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेत सादर केले जाणार आहे.

परंतु या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच संसदेत विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेनं आपली भूमिका बदलली आहे. या विधेयकाचे समर्थन करणारी शिवसेना आता राज्यसभेत वेगळी भूमिका घेण्याची शक्यता असून, काँग्रेसच्या दबावापोटीच सेनेनं भूमिका बदल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय.

या प्रकरणावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, ते म्हणाले की, ‘शिवसेनेने लोकसभेमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आहे. असे असले तरी राज्यसभेत या विधेयकाबाबत वेगळा निर्णय असू शकतो. या विधेयकात आम्ही काही बदल सुचवले आहेत. चर्चेनंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले.

राऊत पुढे म्हणाले की, व्होट बँक राजकारणाला आमचा विरोध आहे. व्होट बँकेचे राजकारण होऊ नये, हे अयोग्य आहे. पुन्हा हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका. या विधेयकात श्रीलंकेतील तामीळ हिंदुंसाठी काहीच नाही आहे. आम्हाला ज्या शंका आहेत त्या आम्ही संसदमध्ये मांडणार. जर आम्हाला उत्तर मिळाले नाही, तर आम्ही त्यांना विरोध करणार आहोत.

Leave a Comment