किरीट सोमय्याच ईडीचे वसुली एजंट; पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज ईडी आणि आयकर विभागाच्यावतीने शिवसेना नेत्याच्या घरी धाडी टाकण्यात आल्या. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप, ईडी, आयकर विभाग व किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला. शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारचे जे गटबंधन झाले आहे. जी आघाडी सरकार अस्तित्वात आले आहे . ते सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. केंद्रिय मंत्र्यांविरोधात किरीट सोमय्या यांनीच पुरावे दिले आहेत. भाजपचे किरीट सोमय्या हे ईडीचे वसुली एजंट आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवन येथे दुसरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊत म्हणाले की, आज जी आयकर विभागाची कारवाई करण्यात आली. माझा ईडीला आणि आयकर विभागाला प्रश्न आहे कि, त्यांच्याकडे कोणता चषमा आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसापूर्वी भ्रष्टाचाराचे पुरावे दिले होते.

आम्ही सुद्धा धाडी टाकण्याचा विचार केला आहे. सध्या आयटीची भानामती सुरु आहे. शिवसनेनेला त्रास देण्यासाठी धाडी सुरु आहेत. पालिका निवडणुकीपर्यंत धाडी सुरुच राहतील. इनकम टॅक्स आणि ईडीला आतापर्यंत 50 नावं दिली आहेत. केंद्रिय तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे. केंद्रिय मंत्र्यांविरोधात किरीट सोमय्यांनीच पुरावे दिलेया आहेत. केंद्रीय यंत्रणा त्या मंत्र्यांच्या घरावर धाडी का टाकत नाही?. ईडी आणि ईडीचे काही अधिकारी भाजपची एटीएम मशिन बनली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना भाजपकडून तिकिट देण्यात आले असल्याचा गौप्य्स्पोट यावेळी राऊत यांनी केला.

ईडीच्या अधिकाऱ्यांकडून अधिकारी बिल्डर्स, कॉर्पोरेटर्सना धमकावण्याचे काम

यावेळी संजय राऊत म्हणाले की, आजही ईडीच्या अधिकाऱ्यांकडून अधिकारी बिल्डर्स, कॉर्पोरेटर्सना धमकावण्याचे काम केले जात आहे. ज्या ज्या कंपनीची ईडीने चौकशी केली त्या कंपन्यांनी जितेंद्र नवलानी यांच्या खात्यावर पैसे पाठवले आहेत. जितेंद्र नवलानी हे ईडीचे वरिष्ठ अधिकारी 2017 मध्ये ईडीनं दिवाण हाऊसिंग फायन्सासची चौकशी सुरु केली. जितेंद्र नवलानीच्या खात्यात 25 कोटी ट्रान्सफर झाले. मग 31 मार्च 2020 पर्यंत वाधवानच्या कंपनीकडून नवलानीच्या कंपनीला पैसे गेले. अविनाश भोसलेंची चौकशी झाली मग भोसलेंकडून 10 कोटी ट्रान्सफर केले नवलानीला नवलानीच्या सात कंपनीन कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले गेले, अशी माहिती राऊत यांनी दिली.

Leave a Comment