सैन्य ठेकेदारीवर घेणं हा संपूर्ण सैन्य दलाचा अपमानच; संजय राऊतांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने नुकतीच एक महत्वपूर्ण योजनेची घोषणा केली ती म्हणजे अग्निपथ योजना होय. या योजनेवरून आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला जाऊ लागला आहे. आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी “मोदी सरकारची प्रत्येक योजना अपयशी ठरली आहे. सैन्यामध्ये जर ठेकेदारी पद्धतीनं भरती होणार असेल तर भारतीय सैन्याची प्रतिष्ठा रसातळाला जाईल. सैन्य ठेकेदारीवर घेणं हा संपूर्ण सैन्य दलाचा अपमानच म्हणावा लागेल, असे म्हणत मोदींवर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अग्निपथ योजनेवरून मोदींवर टीकेचे बाण सोडले. राऊत म्हणाले की, ज्या सैन्यावर संपूर्ण देशाची जबाबदारी आहे, त्यांना कंत्राटी पद्धतीनं कसं काय घेतलं जाऊ शकते? हा संपूर्ण भारतीय सैन्य दलाचा अपमान आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलाचा मोदींकडून अपमान केला जात आहे. ठेकेदारीवर काम करणारे दुसरे असतात. देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्याला ठेकेदारीवर ठेवले जाऊ शकत नाही. देशात सध्या काय चालले आहे किंवा काय होणार आहे हे कोणालाच माहित नाही, असेही राऊत यांनी म्हंटले.

वास्तविक पाहता या योजनेवरुन संपूर्ण देशात आग लागली जात आहे. मोदी सरकारने 10 लाख, 20 लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. याआधी 2 कोटी 10 कोटी अशा घोषणा केल्या होत्या. आता नवीन अग्निपथ अग्निपथ काढले आहे, असा आरोपही राऊत यांनी यावेळी केला आहे.

Leave a Comment