Friday, June 2, 2023

नक्की दारू पिऊन कोण बोलतंय हे पाहावं लागेल; राऊतांचा बंडातात्यांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी एका वाक्यात बंडातात्यांच्या विधानाचा समाचार घेतला.

बंडातात्या कराडकर यांनी राजकीय नेत्यांविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आले असता नक्की दारू पिऊन कोण बोलतंय… हे पाहावं लागेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बंडातात्या नेमकं काय म्हणाले-
हभप बंडातात्या कराडकर यांनी सकाळी सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर दारु पिण्याचे आरोप केले. या सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे या दारुपिऊन रस्त्यावर नाचतात असा आरोप बंडातात्या यांनी केला. सुप्रिया सुळे दारुपिऊन रस्त्यावर पडल्याचे फोटो तुम्हाला ढिगाने मिळतील. राजकारणात येण्याआधी त्या दारुपिऊन पडत होत्या. सुप्रिया सुळे यांनी सांगावं की बंडातात्या खोटं बोलतायत”, असं बंड्यातात्या म्हणाले.