राज्यात पुन्हा सत्तेत येऊ असे भाजपला वाटत असेल तर …; संजय राऊतांचा टोला

raut fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मलिक कुटुंबियांना धीर देत विरोधकांना इशारा दिला. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार तुमच्या सोबत आहे असा धीर संजय राऊतांनी मलिक कुटुंबियांना दिला

यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्य सरकारांना बदनाम करायचे, कामात अडथळे आणायचे, राज्यपालांच्या खांद्यावर बंदुका ठेवायच्या असे प्रकार केल्यावर राज्यात आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ असं त्यांना वाटत असेल तर ते अंधारात चाचपडत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

दरम्यान, डी गॅंग संबंधित व्यक्ती कडून जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांच्या कोठडीत वाढ झाली असून कोर्टाने ७ मार्च पर्यंत वाढ केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष भाजप सातत्याने मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाला आहे.