मोदी सरकार पाकव्याप्त काश्मीर भारताला कधी जोडणार? संजय राऊतांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमावरून संपूर्ण देशात जोरदार राजकारण रंगत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू मुस्लीम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप करत मोदी सरकार पाकव्याप्त काश्मीर भारताला कधी जोडणार असा सवाल संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार टीका केली आहे. काश्मीरमध्ये हिंदू पंडितांना अत्याचाराला सामोरे जावे लागले. आतापर्यंत त्यांची घरवापसी झालेली नाही याचे आम्हाला दुःख आहे. काश्मिरी पंडितांच्या घरवापसचीचे वचन भाजपाने आणि पंतप्रधान मोदींनी दिले होते. ते आतापर्यंत पूर्ण का नाही झाले? काश्मीरचा विकास का नाही झाला? काश्मीरमधली बेरोजगारी का नाही गेली असे एकामागून एक सवाल संजय राऊत यांनी केलं.

सिनेमात किती वास्वत असतं आणि किती काल्पनिक असतं हे लोक पाहतात आणि विसरतात. सिनेमा आवडला तर लोक पाहतील. नाही आवडला तरीही पाहतील आणि आपली भूमिका तयार करतील. काही लोक सिनेमाचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना राजकीय फायदा होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.