हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्ट्राईक रेटच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नाशिक येथे बोलताना आमचा लोकसभेला स्ट्राईक रेट जास्त आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. यावर उत्तर देताना होय तुमचा स्ट्राईक रेट जास्त आहे, बेईमानी आणि खोक्यांचा तुमचा स्ट्राईक रेट जास्त आहे असा टोला संजय राऊतांनी लगावला.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे म्हणतात, त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे. परंतु त्यांचा बेईमानीचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यांचा थैल्या आणि खोक्यांचा स्ट्राईक रेट जास्त आहे. त्यांनी पैशाने स्ट्राईक रेट विकत घेतला आहे. त्यांनी मुंबईची जागा अक्षरशः लुटली हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवली. तर दुसरीकडे भाजपाचे संजय राऊतांचा महिलांना शिव्या देण्याचा स्ट्राईक रेट जास्त आहे, लोकांमधून निवडणूक लढविण्याची हिंम्मत कर मग समजेल असं म्हणत नितेश राणेंनी राऊतांवर पलटवार केला आहे.
दरम्यान महाविकास आघाडीत आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे. आम्ही जास्त जागा लढवयला हव्या होत्या, परंतु महाविकास आघाडीत बिघाड होऊ नये, म्हणून दोन पावले मागे आलो, असे विधान शरद पवार यांनी केलं होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, शरद पवार यांचा स्ट्राईक जास्त हे खरे आहे. पण सांगलीच्या जागी काँग्रेसने काम केले नाही. या जागेवर राष्ट्रवादीने काम केले नाही. दुसरीकडे केंद्र सरकारने सगळ्यात जास्त आम्हाला टार्गेट केले. त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसला.