गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग कुठे फसला?? राऊतांनी सांगितले नेमकं कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोव्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार अशा शक्यता असतानाच जागावाटपाच्या मुद्द्यांवरून एकमत न झाल्याने आघाडीचा प्रयोग फसल्याचे दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी नेमकं कारण सांगत काँग्रेस वर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले, काँग्रेसने आम्हांला दोन-तीन जागा देण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. पण आमच्यासोबत राष्ट्रवादीही आहे. त्यांचाही विचार व्हायला पाहिजे. महाविकास आघाडी जेव्हा आपण बोलतो तेव्हा केवळ शिवसेना राहत नाही. राष्ट्रवादी आहे. त्यांना कोणत्या जागा हव्यात, ते कोणत्या जागांवर लढू इच्छितात यावर चर्चा होणं गरजेचं आहे. ती होऊ शकली नाही. त्याच्यामुळे आम्ही काँग्रेसला शुभेच्छा दिला, असं राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले, ज्या जागा राष्ट्रवादीला हव्या होत्या त्या सोडायला काँग्रेस तयार नाही. काँग्रेसने 40 पैकी 30 जागा लढाव्यात. उरलेल्या दहा जागा शिवसेना, राष्ट्रवादी आणि त्यांचा मित्र पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डला द्याव्यात असं आम्हाला वाटत होतं पण काँग्रेस ला असं वाटतं की गोव्यात त्यांना 40 पैकी 45 जागा मिळतील असा टोलाही त्यांनी लगावला

Leave a Comment