व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मेहबुबा मुफ्ती भाजपची मैत्रीण, भाजपनेच त्यांना बळ दिले; संजय राऊतांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | द काश्मिर फाईल या चित्रपटावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मेहबुबा मुफ्ती यांच्यावरून भाजपवर निशाणा साधला. दहशतवाद्याना पाठिंबा देणाऱ्या मेहबुबा मुफ्ती या भाजपच्या मैत्रीण आहेत. त्यांच्या सोबत भाजपने सत्ता उपभोगली. भाजपनेच त्यांना बळ दिले असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, दहशतवादी अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती या कधीकाळी भाजपच्या मैत्रीण होत्या. मेहबुबा यांच्या पार्टीचे चारित्र्य नेहमीच फुटीरतावादी, काश्मीरच्या समर्थनार्थ राहिले आहे. त्यानंतरही भाजपने त्यांच्याशी युती केली. सत्ता उपभोगली. काश्मिरी पंडितांवर त्याच काळात हल्ले झाले. या मेहबुबा मुफ्ती यांना भाजपनेच बळ दिले आहे.

राऊत पुढे म्हणाले, मुफ्ती यांचा पक्ष कायमच पाकिस्तानच्या बाजूने होता. तरीही तुम्ही त्यांच्याशी युती केली. त्याच काळात लष्कराने दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याच दहशतवाद्यांना स्वातंत्र्यसैनिक ठरवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी भाजप सरकारमधून का बाहेर पडला नाही? आता काश्मीर फाइल्सवर बोलतात, अशा शब्दांत राऊत यांनी टीकास्त्र सोडलं.