प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बबद्दल संजय राऊतांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी रविवार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिले. सरनाईक यांनी लिहलेल्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. मुख्यमंत्र्याना सरनाईक यांनी लिहलेल्या पत्रातील दाव्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सरनाईक यांच्या पत्राबाबत सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,” अशी पहिली प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.

शनिवारी शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहल्यानंतर राजकीय वर्तुळात या पत्रावरून अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना या पत्राबद्दल विचारणा केली. त्यावर राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राऊत “महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे. आता विनाकारण त्रास कोण कुणाला देतंय? तो त्रास नेमका काय आहे? याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. हि गोष्ट गंभीर असून याचा सर्वांनी अभ्यास करावा.”

भारतीय जनता पक्षासोबतची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. ते अजून तुटण्याच्या आधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल, अशा आशयाचं पत्र  प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. काँग्रेस एकला चलो रे ची भूमिका सातत्यानं घेत आहे. राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते कार्यकर्ते फोडत आहेत. अशा परिस्थितीत आपण भाजपसोबत जुळवून घ्यायला हवं, असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.

Leave a Comment