आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, दोन जागा लढवणार; संभाजीराजेंच्या भूमिकेनंतर राऊतांचा थेट इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेच्या प्रवेशाची अट घालत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’ निवासस्थानी आमंत्रितही केले होते. मात्र, संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाकडे व अटींकडे पाठ फिरवत थेट कोल्हापूर गाठले. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंवर निशाणा साधला आहे. “आम्ही आता कोणत्याही परिस्थितीत संभाजीराजेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यास त्यांना पाठिंबा देणार नाही. आम्ही आता शिवसेनेतर्फे दोन जागा लढवणार आहोत. दोन्ही ठिकाणी उमेदवार देऊ आणि ते निवडूनही आणणार आहोत, असा थेट इशारा राऊतांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्हाला संभाजी छत्रपती यांचा प्रस्ताव आला नव्हता. तरीही त्यांना आम्ही शिवबंधन बांधण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यांना वर्षा निवास्थानी बोलवले होते. मात्र, त्यांनी आपली अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यांच्या भूमिकेनंतर आता आम्हीही भूमिका घेतली असून शिवसेनेच्या वतीने आता आम्ही दोन जागा लढवणार आहोत. शिवसेनेने दोन जागा लढवणे हा काही राजकीय अपराध नाही. शिवसेना हा राजकीय पक्ष आहे, असे राऊत यांनी म्हंटले.

संभाजीराजेंकडून 42 मतांची बेगमी?

यावेळी संभाजीराजेंवर टीका करताना राऊत म्हणाले की, राज्यसभेसाठी किती मते लागतात तर ती 42 ही होय. ज्या अर्थी संभाजीराजे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्या अर्थी त्यांनी 42 मतांची बेगमी केली असणार. त्यांना कुणी तरी पाठिंबा दिला असणार, असे राऊत यांनी म्हंटले.

Leave a Comment