Wednesday, October 5, 2022

Buy now

झुठी शान के परिंदे ही, ज्यादा फडफडाते हैं…!; संजय राऊतांचा ट्विटद्वारे अप्रत्यक्ष भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची प्रतिष्ठापणाला लावली आहे. मतदानापूर्वी भाजप नेत्यांकडून आपणच जिंकू असे दावे केले जात आहे. यावरून आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर नाव न घेता निशाणा साधला आहे. “झुठी शान के परिंदे ही ज्यादा फडफडाते हैं…! बाझ की उडान मे कभी आवाज नही होती…. जय महाराष्ट्र अशी ट्विटद्वारे राऊतांनी टीका आलेली आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला आता सुरुवात झाली आहे. पहिल्या दीड तासात 50 टक्के मतदान पूर्ण झाले आहे. आतापर्यंत एकूण 143 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान राऊत यांनी सुरुवातीस माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “महाविकास आघाडीचे सर्व उमेवार निवडून येतील तसेच राज्यसभा निवडणुकीत चुरस वगैरे काही नाही. विरोधकांकडून तसा भ्रम निर्माण केला जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला 169 आमदारांचा पाठिंबा आहे.

दरम्यान, राऊत यांनी ट्विट करत कवितेच्या ओली लिहल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी लिहले आहे की, “झुठी शान के परिंदे ही ज्यादा फडफडाते हैं…! बाझ की उडान मे कभी आवाज नही होती…. जय महाराष्ट्र,” असे ट्विट केले आहे.

महाविकास आघाडीकडील आकडे जास्त झाले तरी भाजपला धक्का बसू नये, अशी अपेक्षा आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. दरम्यान, मतदानाच्या सुरुवातीस शिवसेनेच्या आमदारांकडून मतदान करण्यात आले. संध्याकाळी 5 वाजेपासून मतमोजणी होणार आहे.

अनिल बोंडे म्हणजे बोंड्यावरचा आजार

अनिल बोंडे यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. अनिल बोंडे म्हणजे बोंड्यावरचा आजार आहे, असे म्हणत राऊतांनी निशाणा साधला आहे.

अनिल बोंडे काय म्हणाले?

अनिल बोंडे यांनी आज संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “कोणता अश्वत्थामा गेला होता हे देखील धर्मराजाने सांगितले नव्हते. त्यामुळे कोणता संजय जाणार हे मी सांगणार नाही, ते नंतर कळेल. महाविकास आघाडीतील एक कोणता तरी संजय जाणार आहे. 5.30 वाजता कोणता ते कळेल.