हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्यात आगामी निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपमधून अनेक नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहेत. या दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गोव्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी या ठिकाणी शिवसेनेने एका जागेवरचे डिपॉझिट जप्त होऊ नये हे पाहिले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. त्यावरून राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “मी फडणवीस यांना सांगेन की तुम्ही कितीही नोटा टाका. शिवसेना गोव्यात नक्की लढणार आहे,” असा इशारा राऊतांनी फडणवीसांना दिला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, भाजपचे लोक गोव्यात महाराष्ट्रात नोटांचा पाऊस पडत आहेत. महाराष्ट्रातून नोटांच्या बॅगा जात आहेत. शिवसेना गोव्यात या नोटांशी नक्की लढली. शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा, हिंदुत्ववाद्यांचा पक्ष आहे. मी फडणवीस यांना सांगेन की तुम्ही कितीही नोटा टाका. शिवसेना गोव्यात नक्की लढणार आहे.
शिवसेनेकडून गोव्यातील निवडणुकीकडे लक्ष दिले जात आहे. नुकताच फडणवीसांनी गोव्याचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्यानंतर गोव्यात शिवसेनेने काल एक मंत्री यांनी पक्षाचा त्याग केला. भाजपचे आमदार प्रविण झाटे यांनींही पक्ष सोडला. फडणवीसांनी शिवसेनेबद्दल बोलण्यापेक्षा त्यांच्या पक्षातील युद्ध जे सुरु आहे, त्याची लढाई करावी, असा सल्ला यावेळी राऊतांनी दिला आहे.