शिवसेना युपीएमध्ये सहभागी होण्याच्या हालचालींना वेग; संजय राऊतांनी दिले थेट संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेऊन राष्ट्रीय पातळीवरील अनेक राजकीय विषयांवर खलबते केली.यानंतर शिवसेनेच्या युपीए मधील सहभागाच्या शक्यतांना बळ मिळाले असून संजय राऊत यांनीही याबाबत संकेत दिले आहे. राहुल गांधी भेटीत संजय राऊत यांनी युपीएला पुनर्जिवित केलं पाहिजे असं मत मांडलं आहे

काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय विरोधकांची आघाडी उभी राहू शकत नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी एक पाऊल पुढे टाकण्याचा सल्लाही राऊत यांनी दिला. शिवाय युपीएला पुनरुज्जीवीत करण्याची विनंती करत शिवसेनादेखील युपीएमध्ये सहभागी होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले. संजय राऊत यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं.

आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एक मिनी युपीए चालवत आहोत. आपल्याला केंद्रीय स्तरावरही अशा प्रकारची व्यवस्था करायला हवी,” असं राऊत म्हणाले. मी राहुल गांधींना प्रत्येकाला निमंत्रण देण्यास सांगितलं आहे. कोणीही स्वत:हून येऊन सहभागी होणार नाही. जर एखादं लग्न असेल तर निमंत्रण द्यावं लागतं. आधी निमंत्रण येऊ दे…त्यानंतर आम्ही याबद्दल विचार करु. मी उद्धव ठाकरेंशी याबाबत बोललो आहे असे संजय राऊत यांनी म्हंटल.

Leave a Comment