संजय राऊतांनी घेतली गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री ठाकरेंची भेट; तब्बल दीड तास केली चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यासह इतर भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर आज राऊत यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची भेट घेतली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याचीही उपस्थिती होती. यावेळी राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केलेल्या आरोपांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिली. यावेळी तिघांच्यात तब्बल दीड तास चर्चा केली.

संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या याच्यावर केलेल्या कोट्यवधी रुप्याच्या आरोप प्रकरणाचे पुरावे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना देणार आहे, असे सांगितले. दरम्यान संजय राऊत यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत तिघांमध्ये तब्बल तासभर कमराबंद चर्चाही झाली.

संजय राऊत यांनी काय केले आहेत आरोप?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी ते म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरही वसुली केली आहे. 300 कोटी रुपयांची वसुली फडणवीसांच्या नावाने केली आहे. हा घोटाळा 400 कोटींहून अधिकचा आहे. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर सुद्धा शेकडो कोटी गोळा केल्याची प्रकरण माझ्याकडे आली आहेत, असे राऊत यांनी म्हंटले.

Leave a Comment