Sanjay Raut On Congress : काँग्रेसबद्दल राऊतांचे खळबळजनक विधान; म्हणाले, भाजपाला मदत ….

Sanjay Raut On Congress
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sanjay Raut On Congress । राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर करून २४ तासही उलटले नाहीत तोच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेस आमच्या सोबत नाही असं थेट विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तर दुसरीकडे, राज ठाकरेंच्या मनसेसोबत आमची युती लवकरच जाहीर होईल अशी माहितीही संजय राऊतांनी दिली. राऊतांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीतून काँग्रेस आऊट आणि मनसे इन झाली आहे का? या प्रश्नाला उधाण आलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत? Sanjay Raut On Congress

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, महापालिका निवडणुकीत या क्षणी तरी काँग्रेस आमच्यासोबत आहे, असे मला दिसत नाही. बिहारच्या निकालांनंतर त्यांच्यात आत्मविश्वास वाढला आहे. खरे तर आमच्यासोबत या लढाईत असायला हवे. आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललो. पण त्यांनी ही बाब स्थानिक पातळीवरील नेत्यांवर सोडली आहे. त्या स्थानिक नेत्यांना आमचे आवाहन कायम असेल की, वेगळी चूल मांडून भाजपाला मदत होईल अशी भूमिका कुणीही मुंबईच्या निवडणुकीत घेऊ नये. लोक हे विसरणार नाहीत. भविष्यात लोकसभा व विधानसभेच्याही निवडणुका येणार आहेत हे लक्षात घ्या एवढेच मी त्यांना सांगेन, असा इशारा संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला. Sanjay Raut On Congress

दरम्यान, शिव्या देणारे, मारहाण करणाऱ्यांसोबत कसं जाऊ? असे विधान काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांकडून गेलं गेलं आहे, याबाबत विचारलं असता राऊत म्हणाले, आम्हीही शिव्या देतो. आम्ही शिव्या देत नाही का? मराठी माणूस आहे. एखादी गोष्ट नाही पटली, अन्याय झाला की तो उसळतो. परवा अमित शाहांनी संसदेत शिवी घातली, साला! संसद बंद पाडायला हवी होती. पण तुम्ही सहन केलं ना?” असा प्रतिप्रश्न संजय राऊतांनी काँग्रेसला विचारला.

ठाकरे बंधूंची युती लवकरच –

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र निवडणूक लढत आहेत. लवकरच याबाबत घोषणा जाहीर होईल. यंदाची मुंबई महापालिका निवडणूक हि मराठी माणसाची, मराठी अस्मितेची शेवटची लढाई आहे. मराठी माणूस कोणत्याही पदावर असो, व कोणत्याही परिस्थितीत असो, त्याने या लढाई मध्ये मुंबईला वाचवण्यासाठी उतरायला हवे असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.