Saturday, March 25, 2023

महाविकासआघाडीने भाजपची बायपास सर्जरी केलीय, मध्यप्रदेशसारखं इकडं घडणार नाही – संजय राऊत

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्यप्रदेशमधील राजकीय नाट्यानंतर अनेक भाजप नेत्यांना सत्तेची स्वप्नं पडू लागली आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीसुद्धा महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचं सरकार लवकरच पडेल असं मत बुधवारी सकाळी व्यक्त केलं. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मध्यप्रदेशच्या व्हायरस महाराष्ट्रात येणार नाही म्हणत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

महाराष्ट्रातील भाजपची महाविकासआघाडीने १०० दिवसांपूर्वीच बायपास सर्जरी केली असून इकडे सरकार पडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -