अर्थमंत्री की जादूटोणावाले?? संजय राऊत यांनी डागली निर्मला सीतारामन यांच्यावर तोफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना महामारी ही देवाची करणी आहे असं धक्कादायक वक्तव्य देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. यावरुन आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातील ‘रोखठोक’ या आपल्या सदरातून सीतारामन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सवाल करताना भारताच्या अर्थमंत्र्यांचं हे विधान आर्थिक महासत्तेचा ढोल वाजवणाऱ्या देशाला शोभणारं नाही, अशा शब्दांत त्यांनी सीतारामन यांच्यावर टीका केली आहे.सरकारचे अपयश झाकण्यासाठी देवांना आरोपी करायचं हे कसलं हिंदुत्व? अशा शब्दांत त्यांनी सीतारामन यांचा समाचार घेतला आहे.

सीतारामन यांच्यावर निशाणा साधताना राऊत म्हणाले, ” देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले? चीनच्या कारवाया देखील देवाचीच करणी आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे”. ‘राजा तशी प्रजा’ या म्हणीचा संदर्भ देताना बिहारमध्ये कोरोना देवीचं मंदिर उभारल्याचा आणि महाराष्ट्रात बार्शीत कोरोना देवीची स्थापना झाल्याचा दाखला त्यांनी दिला. अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यांतर्गत करोना देवीची स्थापना करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल झाला तसाच गुन्हा निर्मला सीतारामन यांच्यावर का दाखल व्हायला नको असंही राऊत म्हणाले.

तसेच , ब्राझिलच्या सरकारने कोरोना काळात आपल्या नागरिकांना मदत म्हणून थेट बँकेत रक्कम हस्तांतरीत केली. त्याप्रमाणे आपल्या सरकारंनही काम करणं अपेक्षित असून ही देवाची करणी वैगरे नसून माणसांवर आलेलं संकट आहे. त्यामुळे लोकांना आर्थिक आधार देणे हे सरकारचे काम असल्याचं ते म्हणाले.

You might also like