….तर राज ठाकरेंना मार्गदर्शन करायची आमची तयारी ; संजय राऊतांचं मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय श्रीरामचा नारा दिला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच अयोध्येला जाणार असल्याचे म्हंटल जात आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. प्रभू राम हा काही राजकारणाचा विषय नाही. आम्ही अनेकदा अयोध्येला जाऊन आलो आहोत. त्यांनाही जावसं वाटत असेल तर त्यांनी नक्की जावं. आम्ही त्यांना मार्गदर्शन करू”, असं संजय राऊत म्हणाले. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केल्यानं शिवसेनेनं तिथं राम मंदिराच्या आंदोलनात ऊर्जा भरण्याचं काम केलं होतं. त्यामुळे कुणी कितीही काही म्हटलं, तरी राम मंदिरासाठी शिवसेनेनं घेतलेला पुढाकार तुम्ही नाकारू शकत नाही. आम्ही अनेकदा अयोध्येला गेलो आहोत. प्रत्येकानं तिथं जायला हवं. राज ठाकरे जात असतील तर चांगली गोष्ट आहे. अयोध्येची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन त्यांना हवं असेल तर ते द्यायची आमची तयारी आहे अस संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment