महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी दिसू नये या मागे राजकीय षडयंत्र आहे काय?; संजय राऊत यांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : दरवर्षी प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ सादर केला जातो. यावेळेस मात्र महाराष्ट्राच्या चित्ररथाचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आहे. महाराष्ट्राबरोबरच पश्चिम बंगालच्या चित्ररथाचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊत यांनी ट्विटरवरून म्हंटले की, महाराष्ट्र आणि प.बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनी दिसु नयेत या मागे राजकिय षडयंत्र आहे काय?आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का?

प्रजासत्ताकदिनी दरवर्षी राजपथावर विविध राज्यांचे चित्ररथ साकारले जातात. यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने नेहमीच प्रभावी कामगिरी केली आहे. यावेळेस महाराष्ट्राने मराठी रंगभूमीचे १२५ वर्षे त्या थीमवर चित्र रथ साकारण्याचा प्रस्ताव दिला होता. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्यामुळे या मागे राजकीय कारण असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment