पवार- शहा यांच्यात कोणतीही गुप्त भेट झालीच नाही, अफवांची धुळवड थांबवा ; राऊतांनी विरोधकांना सुनावलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. अहमदाबाद येथे ही भेट झाल्याच्या बातम्या समोर येत अजून यामुळे राज्यातील ठाकरे सरकार वर सर्व काही आलबेल नाही का अशी शक्यता निर्माण झाली आहे. परंतु आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र ही भेट झालीच नाही असं ठामपणे सांगितले आहे.

मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही . आता तरी रहस्य कथेचा शेवट करा.अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही. अस ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मात्र गुगली टाकत या भेटीमागील सस्पेन्स वाढवला आहे. काही गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात, असं शहा यांनी म्हटलं आहे. शरद पवारांसोबत भेट झाल्याच्या वृत्ताचं खंडन अमित शहा यांनी केलेलं नाही. त्यामुळेच शहांचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment